विवाह नोंदणी ऑनलाइन प्रक्रिया

जसे की आपणा सर्वांना माहित आहे की विवाह प्रमाणपत्र हा विवाहाचा पुरावा आहे जो आपले विवाह कायदेशीर संपन्न झालेले आहे हे दर्शविण्याचे काम करते. जे भविष्यात तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. जर तुमचं आत्ताच लग्न झालेले असेल आणि तुम्ही अजूनही विवाह प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन नोंदणी केली नसेल, तर तुम्ही घरी बसूनही अर्ज करू शकता. त्याबद्दल आम्ही तुम्हाला Marriage registration online process या article च्या माध्यमातून संपूर्ण माहिती देणार आहोत तरीपण प्रस्तुत माहिती तुम्ही अगदी शेवट पर्यंत नक्की वाचावी ही नम्र विनंती.

ऑनलाइन लग्न नोंदणी कशी करायची? – How to Register Marriage Online?

           जर तुम्हालाही तुमच्या विवाह प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्ही Official Website वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जायची गरज भासणार नाही आणि तुमचे पैसे आणि वेळ दोन्हीही खर्च करायची आवश्यकता भासणार नाही. आम्ही तुम्हाला या प्रक्रियेसाठी काही steps दिलेल्या आहेत त्या तुम्ही योग्यरीत्या follow करा.

 • सर्वप्रथम महाऑनलाइन च्या aaplesarkar.mahaonline.gov.in या official website वर जा.
 • तुमच्या समोर एक होम पेज उघडेल त्यात तुम्हाला New User वर क्लिक करावे लागेल.
 • त्यांनतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
 • त्यात तुम्ही पर्याय 1 वर क्लिक केल्यास त्याच्या खाली एक फॉर्म उघडेल. ज्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि यूजर आयडी verify करावे लागेल.
 • त्यात तुम्हाला तुमचा जिल्हा, username आणि 10 अंकी मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल तो OTP तुम्हाला त्यात टाकावा लागेल. 
 • यानंतर तुमच्या आधार कार्ड चे क्रमांक टाकून verify करावे लागेल.
 • मग शेवटी तुम्हाला तुमचे पासवर्ड आणि लॉगिन आयडी मिळेल.
 • यानंतर तुम्ही होम पेजवर परत या. लॉगिन करण्यासाठी आपले username आणि password प्रविष्ट करा. 
 • लॉगिन झाल्यानंतर त्यातील profile मध्ये जाऊन विवाह नोंदनी फॉर्म या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • त्यांनतर तुमच्यासमोर एक नवीन अर्ज उघडेल. त्या अर्जामध्ये वधू आणि वरांची संपूर्ण माहिती भरावी लागेल. 
 • आणि त्यानंतर तुम्हाला Submit बटणावर click करावं लागेल.
 • काही दिवसांनंतर तुम्ही तुमच्या जवळच्या अधिकाऱ्याच्या कार्यालयातून जाऊन तुमचे विवाह प्रमाणपत्र गोळा करू शकता.

विवाह नोंदणी अर्जाची स्थिती – Status of Marriage Registration Application

            जर तुम्हाला तुमच्या विवाह नोंदणी अर्जाची ऑनलाईन स्थिती तपासायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अर्ज सबमिट केल्यानंतर प्राप्त होणारी पोचपावती ची स्लिप आवश्यक आहे, ती पावती घ्या आणि आम्ही सांगितलेल्या पुढील स्टेप्स फॉलो करा.

 • सर्व प्रथम वर दिलेल्या Official Website वर जा.
 • आता तुम्हाला तुमचा विभाग होम पेजवर उपलब्ध असलेला “ऑनलाइन उपलब्ध नागरिक सेवा” हा पर्याय निवडावा लागेल.
 • नंतर सेवा नाव आणि प्रमाणपत्र नाव निवडा.
 • त्यानंतर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाका.
 • आता तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्या स्क्रीनवर असेल.

अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या विवाह नोंदणी अर्जाची स्थिती जाणून घेता येईल आणि सर्व माहिती मिळू शकेल.

विवाह नोंदणी अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे – Documents required for marriage registration application

       महाराष्ट्र विवाह प्रमाणपत्र ऑनलाइन नोंदणीसाठी तुम्हाला या महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. ते खालील प्रमाणे पाहुया:

 • आधार कार्ड
 • लग्नपत्रिका
 • लग्नाच्या वेळेचा फोटो
 • वधू आणि वरांचा पासपोर्ट आकाराचा फोटो
 • वयाचा प्रमाण म्हणून तुम्ही तुमचे Birth certificate किंवा school leaving certificate देखील देऊ शकता.
 • विधवासाठी प्रमाणपत्र – जोडीदारासाठी प्रमाणपत्र
 • तुमचे आधी घटस्फोट झालेलं असेल तर तुम्हाला तुमचे घटस्फोट प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
 • इतर कागदपत्रांची झेरॉक्स 
 • लग्नाच्या वेळी उपस्थित असलेले 2 साक्षीदार आणि त्यांचा संपूर्ण तपशील (जेणेकरून काहीही झाले तरी साक्षीदारांना हजर करता येईल).

ऑफलाईन लग्न नोंदणी कशी करायची? – How to Register Marriage Offline?

             जर तुम्हाला विवाह प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करायचा नसेल आणि ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या नगरपालिका कार्यालयात किंवा ग्रामीण भागात ग्रामपंचायत मध्ये जावे लागेल. तेथून तुम्हाला विवाह नोंदणीसाठी अर्ज घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्ही अर्ज भरा आणि मागितलेले सर्व Documents त्या अर्जासोबत जोडा आणि त्यासोबतच तुम्ही 2 साक्षीदारांनाही तुमच्यासोबत कार्यालयात न्यावे लागेल. तुमचा विवाह करणाऱ्या पंडितांनाही तुम्ही साक्षीदार म्हणून घेऊन जाऊ शकता. अर्जामध्ये साक्षीदारांची माहिती टाका आणि त्यांच्या सह्या घ्या.                         

               यानंतर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करावा लागेल आणि कार्यालयातच अर्ज जमा करावा लागेल. आणि यासाठी तुम्हाला १०० रुपये (विवाह नोंदणी शुल्क) भरावे लागतील. कार्यालयात अर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला तुमचे विवाह प्रमाणपत्र मिळेल.  

             उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की जर तुमच्या जन्मतारखेनुसार मुलगी 18 वर्षांची नसेल किंवा लग्नाच्या तारखेनुसार मुलगा 21 वर्षांचा नसेल, तर अशा परिस्थितीत कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करेल. आणि त्यासाठी तुम्हाला शिक्षा देखील होऊ शकते.

What is the Importance Of Marriage Certificate? विवाह प्रमाणपत्राचे महत्त्व काय आहे?

              विवाह प्रमाणपत्र कोण कोणत्या कामासाठी महत्वाचे आहे त्याकरिता आम्ही तुम्हाला खालील प्रमाणे माहिती सांगत आहोत.

 • पासपोर्ट बनविण्यासाठी
 • महिला इतर कागदपत्रांमध्ये तिचे नाव बदलविण्यासाठी 
 • बँक खात्यात Joint Account बनविण्यासाठी 
 • व्हिजा बनविण्यासाठी 
 • जर पती दुसऱ्या देशाचा असेल तर त्या देशाचे नागरिकत्व मिळविण्यासाठी
 • काही परिस्थितीत पतीकडून पोटगी मिळविण्यासाठी
 • पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला सर्व अधिकारांची सामाजिक सुरक्षा प्राप्त करण्यासाठी
 • या कागद पत्रांच्या आधावरच पत्नीला तीचे हक्क मिळविता येतात.

विवाह नोंदणी प्रमाणपत्राचे उद्देश – Purpose of Marriage Registration Certificate

       आपणा सर्वांना माहीत आहे की भारत हा एक खूप मोठा लोकसंख्या असलेला देश आहे. ज्यामध्ये विविध संस्कृतीचे लोक राहतात. पण देशातील कायदे सर्वांसाठी समान आहेत आणि ते कायदे सर्वांना पाळणे गरजेचे आहे. तसेच जर कुणी नियम पाळत नसेल तर त्या व्यक्तीला त्या गुन्ह्याची शिक्षा देखील दिली जाते.

      त्याचप्रमाणे लग्नानंतर विवाहाचा दाखलाही खूप महत्त्वाचा असतो. ज्यामध्ये तुमचे लग्न कायदेशीररित्या पूर्ण झालेले आहे असे मानले जाते. विवाह प्रमाणपत्राचा उद्देश देशात होणारे सर्व बालविवाह थांबवणे आणि त्यांना शिक्षा करणे हा आहे. लग्नानंतर पतीला काही अपघात झाला तर विवाह प्रमाणपत्राद्वारे ती तिच्या सासरच्या घरी स्वतःच्या हक्काने राहू शकते.

FAQ’s

1. विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी कोणत्या वेबसाइट वर अर्ज करावा लागतो?

        महाराष्ट्र सरकारच्या aaplesarkar.mahaonline.gov.in या official website वर जाऊन विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागतो.

2. विवाह नोंदणी ऑफलाईन पद्धतीने करायची झाल्यास कुठं जावं लागते?

           विवाह नोंदणी ऑफलाईन पद्धतीने करायची झाल्यास जवळच्या नगर पंचायत मध्ये किंवा गावच्या ग्रामपंचायत मध्ये देखील तुम्ही विवाह नोंदणी करू शकता. त्याकरिता तुम्हाला 100 रू. एवढी नोंदणी शुल्क भरावी कहते.

3. ऑनलाईन विवाह नोंदणी करण्यासाठी काही अडचण असल्यास कोणत्या क्रमांकावर कॉल करावे?

       विवाह नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करतांना तुम्हाला काही अडचण भासल्यास तुम्ही त्यांच्या 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून मदत मागू शकता.

4. विवाह नोंदणी करण्याचे फायदे काय आहेत?

      नागरिक वैध कागदपत्र म्हणून विवाह प्रमाणपत्राचा वापर तुम्ही करू शकता. त्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे बालविवाहासारख्या गुन्ह्यांना आळा बसेल आणि कोणतेही काम करण्यासाठी नागरिकांना या कागदपत्रांतर्गत त्यांचे हक्क सहज मिळू शकतात.

Conclusion

           तर मित्रांनो आम्ही तुम्हाला Marriage registration online process या Article च्या माध्यमातून विवाह नोंदणी प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. प्रस्तुत माहिती वाचून तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला comment box च्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि आवडल्यास share करायला विसरू नका.